Ad will apear here
Next
संतभार पंढरीत...!

पंढरपूर :

तीर्थांचे जें मूळ, व्रतांचे जें फळ, ब्रह्म ते केवळ पंढरीये
ते आम्हा देखिले आपुल्या नयनीं, फिटली पारणी डोळियांची 

विठूरायाच्या दर्शनाने तृप्त झालेल्या भाविकांची अवस्था या ओवीत वर्णिल्याप्रमाणे झाली आहे. आज आषाढी वारीसाठी पंढरपुरात संतभार लोटला आहे. सुमारे अठरा दिवस चालून आलेले भाविक सोमवारी पंढरपुरात दाखल झाले. त्यामुळे एकच गर्दी झाली. आज, एकादशीच्या पहाटे विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. सोमवारी मुख्य पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या असल्या, तरी गावोगावच्या छोट्या-मोठ्या दिंड्या आजही पंढरपुरात दाखल होत होत्या. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, रेल्वे व खासगी वाहनातूनही भाविक पंढरपुरात आले असून, त्यांची संख्या सुमारे १० ते १२ लाख एवढी आहे. विविध मठ व राहुट्यांमधून राहिलेले वारकरी भल्या पहाटेपासूनच चंद्रभागेच्या स्नानाचा लाभ घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला जात होते. त्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तीचा जणू महापूरच आला होता. 

वाळवंटात दाखल झालेले भाविक आज विविध खेळ खेळत होते. भजन-कीर्तनाचा गजर होत होता. महाद्वार घाटातून वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी जात असताना मोठी कोंडी झाली होती. महाद्वार व पश्चिमद्वार भाविकांनी फुलून गेला होता. भक्त पुंडलिक व नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांना ४८ तासांपेक्षाही जास्त वेळ लागत आहे. एकंदरीत पंढरीतील हा आषाढी वारीचा सोहळा नेहमीप्रमाणेच भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZURBE
Similar Posts
पंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा सोलापूर : ‘झाडू संताचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग’ या संत वचनाप्रमाणे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर १६ जुलै रोजी सोलापूर जिल्हा प्रशासनाने पंढरपुरात राबविलेल्या महास्वच्छता अभियानात एकाच दिवसात सुमारे १४ टन कचरा गोळा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या अभियानात
अकलूजमध्ये ‘संवाद वारी’ सोलापूर : ‘राज्य शासनाने शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या योजनांची माहिती प्रामुख्याने संवाद वारी प्रदर्शनात दिली आहे. संवाद वारी शासकीय योजनांचा अतिशय चांगला उपक्रम असून, वारकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अकलूज (ता. माळशिरस) येथे केले.
‘फेसबुक दिंडी’तर्फे ‘नेत्रवारी’ अभियान पुणे/पंढरपूर : जगातील अशा अनेक सुंदर गोष्टी आहेत ज्या अंध बांधव बघू, अनुभवू शकत नाहीत. आपण त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीच्या नजरेतून न पाहता त्यांच्यासाठी काहीतरी भरीव योगदान देण्याची गरज आहे याच भावनेतून ‘फेसबुक दिंडी’च्या माध्यमातून या वर्षी ‘नेत्रवारी’ हे अभियान राबविण्यात येत असून, त्याद्वारे समाजाला
‘जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना गती द्यावी’ सोलापूर : ‘येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पालखीमार्ग, तसेच जिल्ह्यातील इतर रस्त्यांच्या कामांना गती द्यावी,’ अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांना केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language